Congress : महाराष्ट्रासाठी कॉंग्रेसचा जागावाटपचा फॉर्म्युला ठरला

काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. आघाडी समितीने त्यासाठी आधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि नंतर जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविला. या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 21 ते 22 जागा मिळू शकतात. शिवसेनेला 17 ते 18 जागा मिळू शकतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com