Mumbai Municipal Election : काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील इनसाईड नेमकी काय?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी काल उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव दिग्विजय सिंग यांच्याद्वारे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील इनसाईड बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली. काँग्रेससोबत आघाडी करूनच ठाकरे बंधूंनी निवडणूक लढवावी काँग्रेस हायकमांडने दिग्विजय सिंग यांच्यामार्फत निरोप पाठवल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.
काँग्रेस हायकमांडने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-शिवसेना आघाडीचा प्रस्ताव दिला आहे.
दिग्विजय सिंग यांनी हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचवला आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत.
