Eknath shinde
Eknath shinde Team Lokshahi

मुख्यमंत्र्यांचे भाषण अन भुमरेंचे इशारे! काँग्रेसने व्हिडिओतून शिंदेंना डिवचले

शिंदे किती लांब लांब फेकतात! हेच सांगण्याचा प्रयत्न
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय वातावरण तापलेले आहे. अभूतपूर्व गोंधळानंतर राज्यात आता शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. मात्र, या सरकारवर नवनवीन विषयावर विरोधक टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुख्यमंत्री हे कठपुतली आहे, त्यांना कोणी तरी चावी देत आहे, असा गंभीर आरोप विरोधांकडून वारंवार मुख्यमंत्र्यांवर केला जातो. असाच एक टीका करणारा व्हिडिओ आत महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

काँग्रेसने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर या व्हिडिओद्वारे टीका केली आहे. त्या व्हिडीओसोबत काँग्रेसने लिहले आहे की, कधी फडणवीस सर्वांसमोर चिठ्ठी देऊन शिंदेंना काय बोलायचं ते सांगतात, कधी महाजन तोंडासमोर कागद धरुन काय उत्तर द्यायचं ते पुटपुटतात आणि आता तर शिंदे गटातील आमदार भुमरे देखील शिंदे भाषण करत असताना इशारे करुन लक्ष वेधतात.

मुख्यमंत्र्याची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही आहे! शिंदे किती लांब लांब फेकतात! हेच सांगण्याचा प्रयत्न भुमरे इशाऱ्यामधून करतायत का? असे लिहून काँग्रेसने पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंना डिवचले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com