सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा; विशाल पाटलांच्या बंडबाबत निर्णय होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यातून विशाल पाटील यांच्या बंडबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या मेळाव्यासाठी नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 11 वाजता सांगलीत हा मेळावा पार पडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com