पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत...

पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी आळंदी रोडवर भरधाव मोटारीने 7 वर्षांच्या मुलाला ८०० मीटर पर्यंत फरफटत नेले. यामध्ये सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
Published by  :
Team Lokshahi

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी आळंदी रोडवर भरधाव मोटारीने काही जणांना उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. संतापजनक बाब म्हणजे सात वर्षीय पार्थ प्रणव भोसले याला ७०० ते ८०० मीटर पर्यंत मोटार चालकाने फरफटत नेले. या प्रकरणी दिघी पोलिसांनी राहुल तापकीर वय- ४० वर्षे याला ताब्यात घेतलं आहे.

पार्थ आणि त्याची आई हे स्कुटीवरून चऱ्होली चौकातून दिघीच्या दिशेने जात होते. तेव्हा, भरधाव वाहनाने त्यांना भीषण धडक दिली. यात आई गंभीर जखमी झाली असून मुलगा पार्थ चा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com