Maharashtra Rain : अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका

अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसलेला आहे. सरसकट कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
Published by :
Team Lokshahi

अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसलेला आहे. सरसकट कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा शेकऱ्यांना गांजा लागवडीला परवानगी द्या अशी मागणी केली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाळाशी तूर, गहू, हरभरा आणि कांदा रोपांच मोठं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर कापूस पिकांचदेखील मोठं नुकसान झालं आहे. विविध खासगी सावकारांच कर्ज फेडावं कसं? यामध्ये शेतकरी सापडलेले आहेत. शेतकरी आधीच आसमानी संकटांनी ग्रासलेले असताना मायबाप सरकारने नियम आणि अटी लावून शेतकऱ्यांचे छळ करू नये आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तसचं नुकसान भरपाई द्यावी अन्यथा गांजा उत्पादनाची परवानगी द्यावी, मोफत ते उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी अकोल्यातील बाळापूर तालूक्यातील पूरळ भागातील शेतकरी करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com