Dada Bhuse On Sanjay Raut : दादा भुसेंचा राऊतांवर जोरदार हल्लाबोल

संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर दादा भूसेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.
Published by  :
Team Lokshahi

गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्समध्ये १७८ कोटींची अफरातफर केल्याचा आरोप दादा भुसेंवर आहे. याबाबत ईडी, सीबीआय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मग, दादा भुसेंवर काय कारवाई झाली? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता. या संदर्भात प्रतिक्रिया देताना दादा भुसे यांनी यासंबंधीचे स्पष्टीकरण आधीच दिले आहे असे सांगितले.

त्याचप्रमाणे मी त्यांना आवाहन केलेले आहे, त्यांना ज्या यंत्रणेच्या माध्यमातून अपेक्षित असेल त्यांनी ते केव्हाही चौकशी करू शकतात, असे दादा भुसे म्हणाले आहेत. तसेच या संबंधित शेअर्स सभासदांची सभा झाली त्याचे अधिकृत आमंत्रण देऊनही राऊत यावेळी उपस्थित राहिले नव्हते. त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यावेळी ते उपस्थित राहणे अपेक्षित होते, असे दादा भुसे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com