Vladimir Putin : व्लादिमिर पुतीन यांचा मृत्यू ?; ब्रिटन यंत्रणेचा दावा

ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6च्या प्रमुखांनी एक मोठा आणि धक्कादायक दावा केलाय.
Published by :
Team Lokshahi

ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6च्या प्रमुखांनी एक मोठा आणि धक्कादायक दावा केलाय. रशियाचे व्लादिमिर पुतीन यांचा गंभीर आजाराने या आधीच मृत्यू झाला असून त्या ठिकाणी त्यांच्यासारखीच दिसणारी व्यक्ती काम करते असा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने 'द डेली स्टार'च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाल्याचं चित्र आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांहून जास्त काळ युद्ध सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्बेत बिघडल्याचं सांगितलं जातंय. त्यातच पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो असा दावा हा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com