कधीकाळचे मित्र का झाले वैरी? काय आहे राणे-केसरकरांमधील वाद?

कधीकाळी मित्र असलेले हे दोघेही आज पक्के राजकीय वैरी का आहेत? हाच प्रश्न सध्या सर्वांना पडलाय?
Published by :
Team Lokshahi

एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत गेला... पण नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील राजकीय वैर संपत नाहीयं. शनिवारी केसरकर यांनी राणेंना लक्ष्य केलं....मग निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं...कधीकाळी मित्र असलेले हे दोघेही आज पक्के राजकीय वैरी का आहेत? हाच प्रश्न सध्या सर्वांना पडलाय?

दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे हे राजकीय द्वंद सध्या रंगलेलं दिसून येतंय... दोन्ही नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील... कधी काळी पक्के मित्र...आज राजकीय शत्रू झाले... एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आले.. अगदी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हे देखील एकत्र आले. पण दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातलं राजकीय वैर संपण्याचा काही नाव घेत नाहीये.

काय आहे राणे-केसरकर वाद

  • सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्षपदावर असल्यापासूनच दीपक केसरकर आणि राणे यांच्यांत वाद.

  • 2009 विधानसभा निवडणुकीत केसरकर राष्ट्रवादीकडून विजयी झाले. काँग्रेसमध्ये असलेल्या राणेंनी त्यांना मदत केली.

  • मे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने निलेश राणेंना तिकीट दिले. पण केसरकरांनी शिवसेनेचे विनायक राऊतांना पाठिंबा दिला. निलेशचा पराभव.

  • ऑगस्ट 2014 मध्ये केसरकर शिवसेनेत गेल्यावर आक्रमकपणे राणेंविरोधात बोलू लागले.

  • 2014 मध्ये केसरकर यांनी राजन तेली यांचा पराभव केला, तो ही राणे यांना जिव्हारी लागला.

  • नारायण राणे यांनी अनेकदा व्याासपीठावरुन या दोन्ही पराभवातील छल्य बोलून दाखवले

शनिवारी दीपक केसकरांनी आरोप केल्यानंतर माघार घेतली पण आता निलेश राणेंनी केसरकरांना थेट ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर देऊन डिवचले आहे. त्यामुळे शिंदे गट-भाजपमध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com