Delhi Metro | दिल्ली मेट्रोत सीटवरुन दोन महिला भिडल्या, शिवीगाळ करत जोरदार हाणामारी

दिल्ली मेट्रोत दोन महिलांच्या जोरदार हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, सीटवरुन झालेल्या वादामुळे शिवीगाळ करत हाणामारी.
Published by :
shweta walge

दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातच आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोत शिवीगाळ करत दोन महिलांची तुफान हाणामारी झाली आहे. दिल्ली मेट्रोत सीटवरुन दोन महिला भिडल्या.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत महिला वर्ग दिसत आहे. काही वेळात मेट्रोमध्ये असलेल्या दोन महिलांमध्ये जागेच्या कारणांवरुन वाद सुरु होतात. पाहता पाहता हे वाद कधी हाणामारीत बदलताच हे तिथे बसलेल्या महिलांनीही कळत नाही. दोन महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ तिथे असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद करत सर्वत्र व्हायरल केलेला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com