व्हिडिओ
Vidhansabha निवडणुकीत 3,513 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त | Marathi News
विधानसभा निवडणुकीत 3 हजार 513 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले आहे. मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्यानं उमेदवारांना फटका बसला आहे. यामध्ये मनसे आणि वंचितच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे.
राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय राज्यस्तरीय राजकीय पक्षांसह छोट्या-मोठ्या १५८ पक्षांचे तसेच अपक्ष मिळून एकूण ४ हजार १३६ उमेदवारांनी नशीब आजमावले. निवडणूक लढविलेल्या उमेदवारांमध्ये ३ हजार ५१३ जणांना अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण न करता आल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामध्ये मनसे व वंचितच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. निवडणूक लढविलेल्या १५८ छोट्या-मोठ्या पक्षांपैकी केवळ 14 पक्षांचे आमदार हे विधानसभेत पोहोचले आहेत. तर २ हजार ८६ पैकी २ अपक्षांना विजयश्री खेचून आणता आली नाही.