Devendra Fadnavis on Jarange : 'जरांगेंच्या मागे बोलविता धनी कोण?'- देवेंद्र फडणवीसांचा सवाल

जरांगेंच्या मागे बोलविता धनी कोण आहे? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. जरांगेच्या घरी जाणारे नेमके कोण आहेत असा सुद्धा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

जरांगेंच्या मागे बोलविता धनी कोण आहे? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. जरांगेच्या घरी जाणारे नेमके कोण आहेत असा सुद्धा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र असल्याच मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे. तर हा सगळा फडणवीसांच डाव असल्याच जरांगे पाटील म्हणाले आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे प्रश्न उपस्थित केले होते तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मरांठ्याच्या अंगाला हाताखाली धरुन मला मारणार आहे, अरे मी हसत मरतो पण ओबीसातून मराठाला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

अध्यक्ष महोदय आपण एसआयटी सांगितलं आहे एसआयटी तयार होईलचं पण मला मनोज जरांगे पाटलांशी काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com