Devendra Fadnavis On Corona : कोरोना वाढतोय, फडणवीसांनी नागरिकांना केली 'ही' विनंती!

कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटने जगाचे टेन्शन वाढवले आहे. देशातही गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

पुणे : कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटने जगाचे टेन्शन वाढवले आहे. देशातही गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, 9 महाराष्ट्रात, 8 कर्नाटक, 6 केरळ, 4 तामिळनाडू आणि 2 तेलंगणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही, काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. मुख्यमंत्री यांनी याबाबत बैठक घेतली आहे. आपला पूर्वानुभव पाहता त्यामुळे काळजी घ्यावी लागेल, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com