Devendra Fadnavis on Vishwajeet Kadam: 'विश्वजीत तुझा मुहूर्त लावतो थांब’ कदमांना फडणविसांचा चिमटा

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यावर दररोज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यावर दररोज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये आमदार कदम हे फडणवीस यांच्या मागे धावताना दिसत आहेत. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे आज उपमुख्यमंत्री विधानभवनाबाहेर पडत असताना त्यांच्या मागे धावताना दिसले. विश्वजीत कदम यांना देवेंद्र फडणवीस म्हणाले ’विश्वजीत थांब तुझा मुहूर्त लावतो लवकरच.’यानंतर देखील दोन्ही नेते आपापसात चर्चा करताना दिसून येत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाटबंधारे विभागाच्या एका प्रकल्पावर चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान राजकीय वर्तुळात या व्हिडिओची सध्या चर्चा सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com