Devendra Fadnavis and Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस, शरद पवारांना धमकी प्रकरण, आरोपी दादरमधून अटक

देवेंद्र फडणवीस, शरद पवारांना धमकी प्रकरण आणि या प्रकरणी धमकीचे फोन करणाऱ्याला दादरमधून अटक करण्यात आलेली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

देवेंद्र फडणवीस, शरद पवारांना धमकी प्रकरण आणि या प्रकरणी धमकीचे फोन करणाऱ्याला दादरमधून अटक करण्यात आलेली आहे. 38 वर्षीय सचिन जाधवला दादरमधून शस्त्रासह अटक करण्यात आलेली आहे. सचिन जाधवने पवार, फडणवीसांच्या निवासस्थानी अनेकदा फोन केल्याचे समोर आलेलं आहे. सचिन जाधवला 28 मार्चला दादर स्थानकावरून ताब्यात घेतलं असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

सचिन नामदेव जाधव 38 राहणारा वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली अस अटक आरोपीचे नाव आहे. सचिन जाधव याने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानकावर अनेकदा धमकीचे फोन केल्याची माहिती समोर येत आहे. जाधव याच्यावर सांगली जिल्ह्यात कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नसून आरोपीने मात्र सागर आणि सिल्वर ओक वर धमकीचे कॉल करत असल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com