व्हिडिओ
Dilip Mohite Patil | ...नाहीतर मी घरी बसतो, दिलीप मोहिते पाटील यांचा वळसे पाटलांवर निशाणा | Lokshahi
दिलीप मोहिते पाटील यांनी अजित पवारांना थेट सुनावत म्हटले की, 'मागच्या दाराने जाणं, भीक मागणं, हात पसरणे हा माझा स्वभाव नाही. सन्मानानं द्या, नाहीतर मी घरी बसतो.' त्यांनी तीन पक्षांच्या सरकारबद्दल शंका व्यक्त केली.
"मागच्या दाराने जाणं, भीक मागणं, हात पसरणे हा माझा स्वभाव नाही. काय द्यायचं ते सन्मानानं द्या, नाहीतर मी घरी बसतो," अशा शब्दांत मोहिते पाटील यांनी अजित पवारांना थेट सुनावले. तीन पक्षांचं जरी सरकार असलं तरी एकमेकांना मदत करतील का, अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत मदतीची गरज असताना वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांनी पाठ फिरवली, अशी खंतही मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. ते राजगुरुनगर येथे आयोजित मतदार आभार मेळाव्यात बोलत होते.