धक्कादायक! चहा दिला नाही म्हणून डॉक्टरांनी अर्ध्यावर सोडलं ऑपरेशन

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत नागरिकांना सर्दी- तापापासून ते बाळंतपण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

कल्पना नळसकर - असूर , नागपूर

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत नागरिकांना सर्दी- तापापासून ते बाळंतपण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेळेवर चहा न मिळाल्याने डॉक्टर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याची संतापजनक घटना घडली. याची गंभीर दखल घेत जि.प.च्या उपाध्यक्ष व आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी या प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी कुटुंब नियोजन शल्यक्रियेसाठी आठ महिलांना बोलावण्यात आले होते. महिलांना शस्त्रक्रियेसाठी भुलीचे इंजेक्शन दिले होते. परंतु, वेळेवर चहा न मिळाल्याने संतापलेले डॉक्टर ऑपरेशन सोडून निघून गेले. हा प्रकार लक्षात येताच प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच खळबळ उडाली.

ज्या महिलांच्या शल्यक्रिया शिल्लक होत्या, त्यांच्या नातेवाइकांना याची माहिती मिळताच, त्यांनी जिल्हा परिषद सदस्या राधा अग्रवाल व सरपंच माधुरी वैद्य यांना माहिती दिली. या दोघीही आरोग्य केंद्रात दाखल होताच, त्यांच्याही हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी लगेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था केल्याने अनर्थ टळला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com