व्हिडिओ
BEST Bus News : आठवडाभरात 'बेस्टची' भाडेवाढ लागू होणार? परिवहन प्राधिकरणाच्या लेखी मंजुरीची प्रतीक्षा
बेस्ट बस भाडेवाढ: मुंबईकरांसाठी आठवडाभरात दुप्पट भाडे लागू होणार, परिवहन प्राधिकरणाच्या लेखी मंजुरीची प्रतीक्षा.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या तिकीट दरात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनापाठोपाठच परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. मात्र, परिवहन प्राधिकरणाकडून अद्याप लेखी प्रत मिळालेली नाही.
त्यामुळे ती प्रत मिळाल्यानंतर या 8 मेपासून भाडेवाढ लागू करण्याची तयारी बेस्ट प्रशासनाने केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच बेस्ट बसच्या प्रवासासाठी दुप्पट भाडे द्यावे लागणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांचे सध्याचे भाडे अतिशय कमी आहे. त्यामुळे प्रवाशांची, मुंबईकरांची या बेस्ट बसला पसंती असते. मात्र, या बसभाड्यात दुप्पट वाढ होणार आहे.