नवी मुंबईतील उलवेमधून 50 लाखांचं ड्रग्ज जप्त

नवी मुंबईतील उलवेमधून 50 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतील उलवेमधून 50 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी एका फार्महाऊसचा ऑपरेटर आणि फूड डिलिव्हरी बॉय (झोमॅटो) या दोघांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ड्रग्ज तस्करीप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून आरोपींपैकी एक जण झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्यांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला असून ड्रग्ज कुठून आणले आणि कोणाला विकायचे होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com