ED : महादेव अ‍ॅपच्या मालकाला ताब्यात घेण्यासाठी'ईडी'ची परराष्ट्र मंत्रालयाला विनंती

ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करत सहा हजार कोटी रुपयांचा हवाला व्यवहार करणारा महादेव अ‍ॅपचा मालक सौरभ चंद्राकर याला ईडीच्या ताब्यात घेण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला त्याच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली असल्याची माहिती आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करत सहा हजार कोटी रुपयांचा हवाला व्यवहार करणारा महादेव अ‍ॅपचा मालक सौरभ चंद्राकर याला ईडीच्या ताब्यात घेण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला त्याच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली असल्याची माहिती आहे. परराष्ट्र मंत्रालयानेदेखील ही विनंती मंजूर करत प्रक्रिया सुरू केल्याचे समजते. सौरभ चंद्राकर सध्या दुबईत आहे. महादेव अ‍ॅपच्या मालकांविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस यापूर्वीच आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रत्यार्पणासाठी विनंती केली आहे. महादेव अ‍ॅपच्या मालकांनी सट्टेबाजीसाठी एकूण 60 अ‍ॅपची निर्मिती केली होती. या अ‍ॅपची सर्व सुत्रे दुबईतून हलविण्यात येत होती. मात्र, त्याच्या प्रसारासाठी भारतात तब्बल दोन हजार ऑपरेटरची नेमणूक त्यांनी केली होती. महादेव अ‍ॅपच्या मालकांना या प्रत्येक अ‍ॅपच्या माध्यमातून महिन्याकाठी 40 लाखांपर्यंत नफा मिळत होता. या प्रकरणात आतापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी 14 लोकांवर आरोप ठेवला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी 39 ठिकाणी छापेमारी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com