मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार अयोध्येला जाणार नाहीत? काय कारण

राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी देशभरात जोरात सुरू आहे. मात्र, 22 जानेवारीला या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नसल्याचे समोर येत आहे.

मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी देशभरात जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मात्र, 22 जानेवारीला या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नसल्याचे समोर येत आहे. शिंदे-फडणवीस आणि अजित पवार 22 तारखेला अयोध्येत जाणार नाहीत. 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. रामाचं दर्शन कधी घेणार तारीख, वेळ लवकरच सांगणार असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com