Eknath Shinde : सस्पेन्स संपला; एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज 5 डिसेंबर 2024ला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. आज शपथविधी सोहळा होणार असून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता सस्पेन्स संपला असून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
यातच वारंवार एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून, आमदारांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
याच पार्श्वभूमीवर आता ज्या विषयाची चर्चा सुरु होती की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून एकनाथ शिंदे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.