OBC Elgar Melava : धाराशिवमधील ओबीसींचा एल्गार मेळावा वादाच्या भोवऱ्यात

धाराशिव येथे आज होणारा ओबीसींचा एल्गार मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुरुवातीला हा मेळावा धाराशिव शहरातील गाझी मैदान येथे होणार होता.
Published by :
Team Lokshahi

धाराशिव येथे आज होणारा ओबीसींचा एल्गार मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुरुवातीला हा मेळावा धाराशिव शहरातील गाझी मैदान येथे होणार होता. परंतु गाझी मैदान परिसरात उरूस असल्याने प्रशासनाकडून ऐनवेळी ही जागा बदलून इतर जागी हा मेळावा घेण्याबाबत आयोजकांना सूचित करण्यात आल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मेळावा घेण्यात येत आहे. मात्र आता तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना प्रस्थापित मंडळी प्रशासनाला पुढे करुन मेळावा यशस्वी होण्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. मात्र कोणी कितीही अडचणी आणला तरी मेळावा यशस्वी करून दाखवणारच असा दावा आयोजकांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com