येरवडा कारागृहातून पळालेला कैदी परतला

येरवडा कारागृहातून पळून गेलेला कैदी पुन्हा कारागृहात परतला असल्याची घटना घडली आहे.

पुणे : येरवडा कारागृहातून पळून गेलेला कैदी पुन्हा कारागृहात परतला असल्याची घटना घडली आहे. आशिष जाधव असे या कैद्याचे नाव आहे. आशिष जाधव येरवडा खुल्या कारागृहातून दोन दिवसांपूर्वी पळून गेला होता. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला वृद्ध आई-वडिलांची काळजी वाटल्याने तो पसार झाल्याचा दावा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला भेटण्यासाठी जाधव कारागृहातून पसार झाल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली. दरम्यान, वारजे-माळवाडी परिसरात २००८ मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात जाधवला २०१५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com