Sharad Pawar: शरद पवार पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा, शरद पवार गटाची प्रतिक्रिया काय?

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एनसीपी-एसपीचा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विजय शिरोडकर फरार असल्याची माहिती आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एनसीपी-एसपीचा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विजय शिरोडकर फरार असल्याची माहिती आहे. कपडे विक्रेत्याकडून 85 हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. बोरिवलीतल्या जया टॉकिज परिसरात खंडणी वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय शिरोडकर फरार आहे. विजय शिरोडकरमुळं गुन्हेगारांच्या राजकीयकरणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com