Pachgani : पाचगणीतलं फर्न फाईव्ह स्टार हॉटेल सील, समीर हिंगोराची फर्न हॉटेलमध्ये पार्टनरशीप

पाचगणीतील पंचतारांकीत फर्न हॉटेलवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पाचगणीतील पंचतारांकीत फर्न हॉटेलवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाकडुन फर्न हॉटेल अखेर सील करण्यात आलं आहे. फर्न हॉटेलमध्ये समीर हिंगोरा यांची पार्टनरशिप असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. समीर हिंगोरा हे 1993 च्या बाँम्बस्फोटातील आरोपी आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर फर्न हॉटेलवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. फर्न हॉटेल अनाधिकृत बांधल्याबाबत अनेक तक्रारी होत्या. सर्व कस्टमर्सना बाहेर काढुन ही कारवाई पूर्ण करण्यात येत आहे. सुरवातीस या हॉटेलला परवानगी होती, मात्र नियमांच उल्लंघन करुन याचे काही मजले बांधन्यात आल्यानंतर याची परवानगी रद्द करत यावर कारवाई करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com