Kolhapur: कोल्हापुरात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर मधील म्हाडा कॉलनीत एका घरात गर्भलिंग चाचणी करून देतो.
Published by :
Team Lokshahi

कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर मधील म्हाडा कॉलनीत एका घरात गर्भलिंग चाचणी करून देतो. तसेच मुलगा होण्यासाठी विविध उपचार करू अशा भुलथापा लावत सोनोग्राफी द्वारे प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान सुरू होते. त्या घरावर शहर आरोग्य पथक आणि महिला बालकल्याण समितीच्या पथकाने छापा टाकत फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. यावेळी अंधश्रद्धेस खतपाती घालणाऱ्या वस्तू विसरत करण्याचा प्रयत्नही केल्याचं आढळून आलं. दरम्यान या प्रकरणी घरातून अमित डोंगरे आणि कृष्णात जासूद या दोघांना करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य एक जण पळून गेला असल्याचं पोलिसांनी सांगितल आहे. दरम्यान घरातून सोनोग्राफी मशीन सह गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com