Zika virus : कोल्हापूर शहरात चार गर्भवतींना झिकाची लागण

कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात चार गर्भवतींना झिका व्हायरसची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
Published by :
Team Lokshahi

कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात चार गर्भवतींना झिका व्हायरसची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तत्काळ या चार महिलांची सोनोग्राफी करून गर्भास धोका नसल्याची खात्री केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तरी संपूर्ण राज्याची यंत्रणा सतर्क झाली आहे. आता कोल्हापूर शहरात या व्हायरसने शिरकाव केल्याने मुंबई- पुण्यालाही हा सावधानतेचा इशारा दिला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com