व्हिडिओ
Free Treatment : मोठी बातमी! 15 ऑगस्टपासून शासकीय रुग्णालयात मोफत उपचार
स्वातंत्र्य दिनापासून राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: स्वातंत्र्य दिनापासून राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना मिळणार असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य खात्याशी संबंधित हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतंर्गत सर्व उपचार मोफत मिळणार असून सर्व शस्त्रक्रियाही मोफत असणार आहेत. हा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून 15 ऑगस्टपासून ही योजना लागू होणार आहे.