गजानन काळेंची अजित पवारांवर खोचक टीका; कधी 'धरण' तर आता 'जमीन...

मीरा बोरवणकर यांनी पुस्तकांतून अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरच आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या पार्श्वभूमीवर गजानन काळ यांनी खोचक टीका केली आहे.

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकांत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली जमीन एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह अजित पवारांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. यावरच उपमुख्यमंत्री आता अजित पवार यांनी आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रवक्ते गजानन काळ यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे.

दादांनी मुख्यमंत्री पदाचा 'कोट' शिवायला टाकला की काहीना काही विघ्न येतंच. कधी 'धरण' तर आता 'जमीन' पाठ सोडेना. स्पष्टीकरण देवून देवून आमच्या बिचाऱ्या घासलेट चोराच्या पंपातल घासलेट संपलं, अशा शब्दात गजानन काळेंनी अजित पवारांवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com