Special Report : Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड राजकीय गुन्हेगारीचा चेहरा, गायकवाड पॅटर्न

गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार करुन राजकीय गुन्हेगारीचा गायकवाड पॅटर्न समोर आलंय. गणपत गायकवाड हे राजकीय गुन्हेगारीचा चेहरा होऊ पाहतायत असा आरोप होतोय.
Published by :
Team Lokshahi

गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार करुन राजकीय गुन्हेगारीचा गायकवाड पॅटर्न समोर आलंय. गणपत गायकवाड हे राजकीय गुन्हेगारीचा चेहरा होऊ पाहतायत असा आरोप होतोय. सहा सेकंदात सहा गोळ्या झाडणारा हा राजकीय गुंड गणपत गायकवाडवर स्पेशल रिपोर्ट

सरावलेल्या गुंडाला आणि गुन्हेगारालाही लाजवेल अशा प्रकारे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. गणपत गायकवाड यांनी सहा सेकंदात सहा गोळ्या झाडल्या. सहा सेकंदात त्यांनी एवढंच नाही तर रिव्हॉल्वर रिकामं झाल्यानंतर गणपत गायकवाड महेश गायकवाड यांच्या डोक्यावर रिव्हॉल्वरच्या बटनं मारहाण करत होते. त्यानंतर महेश गायकवाड यांच्या अंगावर अक्षरक्षः तुटून पडले होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करुन महेश गायकवाडांची सुटका करावी लागली. सत्ताधाऱ्यांमध्येच हाणामाऱ्या सुरु झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com