Girgaon Linkedin Post Viral: गिरगावात जॉबसाठी आक्षेपार्ह जाहिरातीमुळे संताप; मराठी माणसालाच केली बंदी

गिरगावातील जॉबसाठी आक्षेपार्ह जाहिरातीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
Published by :
Sakshi Patil

गिरगावातील जॉबसाठी आक्षेपार्ह जाहिरातीमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मराठी माणसाच्या गिरगावात गुजराती कंपनीची मुजोरी? सुरू आहे असा सवाल उपस्थित होत आहे. संताप वाढल्यावर पोस्ट डिलीट करण्यात आली आणि कंपनीनं माफिनामा जाहीर केला.

गुजरातमधील एका भरती करणाऱ्या कंपनीच्या एचआरकडून मुंबईतील गिरगावमधील कार्यालयासाठी ग्राफिक डिझायनर हवा असल्याची जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. साडेचार लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्नही देण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होतं. मात्र या जाहिरातीच्या अखेर 'इथे मराठी उमेदवारांचे स्वागत नाही' असेही नमूद करण्यात आल्याने वातावरण तापले. विशेष म्हणजे मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर असलेल्या मुंबईत तेही गिरगावमधील कार्यालयासाठी अशी जाहिरात पोस्ट करण्यात आल्याने उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com