Gondia Teacher Strike : गोंदियात प्राथमिक शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार हलका करा'आंदोलनकर्त्या शिक्षकांची मागणी
Published by :
Team Lokshahi

गोंदिया: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तर्फे गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकामध्ये महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महाआक्रोश मोर्चामध्ये गोंदिया जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते.

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे न देता फक्त शिकविण्याचे कामे द्या. या प्रमुख मागणीसह विविध 46 मागण्यांना घेऊन महामोर्चा काढण्यात आलेला होता. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात शिक्षकांनी घोषणाबाजी केली. त्यामध्ये या सरकारचा एकच छंद भट्टी सुरू शाळा बंद अशा घोषणा देत शिक्षकांनी राज्य सरकारचा निषेध नोंदविला.

गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक पासून हा महाआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com