Land Acquisition : सरकारचा महत्वाचा निर्णय! भूसंपादनाच्या व्याजदराच्या मोबदल्यात मोठी कपात

महत्त्वाचा निर्णय: भूसंपादनाच्या मोबदल्यात व्याजदरात कपात, शेतकऱ्यांना 15% ऐवजी 9% व्याजदर
Published by :
Prachi Nate

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, गृह, महसूल, नगरविकास आणि विधी व न्याय विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

यात महसूल व वन विभागामध्ये, भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम-30(3), 72 व 80 मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणार्‍या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल करण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाने घेतलेल्या या निर्णयाने भूसंपादनसाठीच्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम सरकारनं कमी केलेली आहे.

शेतकऱ्यांना आता 15टक्क्यां ऐवजी 9 टक्क्यावर व्याजदराचा मोबदला मिळणार आहे. त्यामुळे आता सरकारचा मोठा खर्च वाढणार आहे. मात्र भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com