Vasai : मकर संक्रांतीनिमित्ताने वसईच्या संसिटी मैदानात भव्य पतंग महोत्सव

मकर संक्रांती निमित्ताने वसईच्या संसिटी मैदानात भव्य पतंग मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Team Lokshahi

मकर संक्रांती निमित्ताने वसईच्या संसिटी मैदानात भव्य पतंग मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गुजराती परिवाराने या मोत्सवाचे आयोजन केले असून हजारो नागरिक रंगीबीरंगी पतंग घेऊन यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. वसई विरार महापालिकेच्या माजी प्रथम महिला महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर यांनी देखील या पतंग मोत्सवत आपला सहभाग नोंदवून एक आगळा वेगळा आनंद व्यक्त केला आहे. दर वर्षी मकर संक्राती हा सण वसईत मोठ्या उत्साहात आणी आनंदात पार पडतो.लहान मुले, महिला,पुरुष वयोवृद्ध नागरी यात मोठ्या संख्येत सहभागी होतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com