Jalna : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त जालन्यात भव्य शोभा यात्रा

जालन्यात प्रभू श्रीराम यांच्या आयोध्या येथील प्राणप्रतिष्णा सोहळा निमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

जालन्यात प्रभू श्रीराम यांच्या आयोध्या येथील प्राणप्रतिष्णा सोहळा निमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली आहे. शहरातील आनंदवाडी येथील श्रीराम मंदिरापासून यात्रेला सुरुवात झाली असून, बडी सडक येथील श्रीराम मंदिरात या शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला. 22 जानेवारी रोजी रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून, त्याच पार्श्वभूमीवर जालन्यात प्रभू श्री रामचंद्र यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. यावेळी श्रीराम जय राम जय जय राम जय जय घोषणे परिसर दणाणून गेला आहे. रामभक्त मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com