Palghar : पालघरच्या वेवजी आणि झाई गावात गुजरातची घुसखोरी

कर्नाटकने बळकावलेली 865 मराठी गावे महाराष्ट्राला अजूनही परत मिळवता आलेली नसतानाच आता गुजरातनेही पालघर जिल्ह्यात घुसखोरी करत दोन मराठी गावे बळकावण्याच्या हालचाली चालवल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi

कर्नाटकने बळकावलेली 865 मराठी गावे महाराष्ट्राला अजूनही परत मिळवता आलेली नसतानाच आता गुजरातनेही पालघर जिल्ह्यात घुसखोरी करत दोन मराठी गावे बळकावण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी आणि झाई या गावात असलेला सीमादर्शक दगड सुमारे 150 मीटर महाराष्ट्राच्या बाजूला आतमध्ये सरकवून गुजरातने आपली हद्द वाढवल्याने इथे नवा संघर्ष उद्भवला आहे. गुजरातच्या ग्रामपंचायती आता मराठी गावकऱ्यांना नोटिसा बजावू लागल्याने हा वाद समोर आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com