Harshwardhan Sapkal : "ईडीने स्वतःच आपले कार्यालय जाळून टाकले" हर्षवर्धन सपकाळ यांचं खळबळजनक वक्तव्य

मुंबईच्या ईडी कार्यालयाच्या इमारतीला आग लागली यावर "ईडीने स्वतःच कार्यालय जाळले", हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील ईडी कार्यालयात रविवारी पहाटे आग लागली. एजन्सीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद इमारतीत भीषण आग लागल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीचे कार्यालयही याच इमारतीत आहे.

मुंबईच्या ईडी कार्यालयाच्या इमारतीला आग लागली यावर राजकीय पडसाद पडत आहेत. "सब गोलमाल है सब गोलमाल है सिद्धे रस्ते की ये टेडी चाल है ईडीने आपले स्वतः चेच कार्यालय जाळून घेतले", अशा कडक शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दहा वर्षात विरोधकांना जेरीस आणण्याकरिता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी, विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांना पक्षांतर करण्यास बाध्य करण्यासाठी ईडीच्या कार्यालयाचा उपयोग झाला आहे. आता त्यांच्या विरोधात कुठलेच पुरावे नाही हा कांगावा करण्यासाठी ईडीने आपले कार्यालयच जाळून टाकले. अशी जळजळीत टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com