व्हिडिओ
Alibaug : अलिबागमध्ये पावसाची दमदार हजेरी, रुग्णालयात शिरलं पाणी, रुग्णांचे प्रचंड हाल
अलिबागमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे.
अलिबागमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे रुग्णालयात पाणी शिरलेलं आहे. रुग्णालयात भर पाण्यात रुग्णांवर उपचार सुरु आहे. रुग्णालयात पाणी साचल्याचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रुग्णालयाच्या सर्जिकल वॉर्ड मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दुरुस्तीसाठी सज्जे तोडल्याने पावसाचे पाणी वॉर्डमध्ये आले असा दावा सिव्हिल सर्जन डॉ. अंबादास देवमाने यांनी केला आहे. रुग्णालयासाठी पर्यायी व्यवस्था नाही.