Srinagar
Srinagar

Srinagar : श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; विमानसेवा काही काळासाठी स्थगित

श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असून विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Srinagar) श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असून विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. सर्व विमानसेवा ठप्प झाली असून संपूर्ण श्रीनगर शहर बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली झाकून गेल्याचे पाहायला मिळत आहे.

या बर्फवृष्टीमुळे धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून पर्यटकांची गैरसोय झाली आहे. पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 24 तासांत आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बर्फ हटवण्यासाठी प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन सज्ज असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • श्रीनगरमध्ये रात्रीपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू

  • जनजीवन विस्कळीत, पर्यटकांची गैरसोय

  • आज सर्व कंपनीच्या विमानसेवा काही काळासाठी स्थगित

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com