व्हिडिओ
Imtiaz jaleel : फक्त मुंब्राच नाही पूर्ण देश हिरवा करु', इम्तिआज जलील यांचं वक्तव्य
Maharashtra Politics: AIMIM नेते इम्तिआज जलील यांनी मुंब्र्यात सहर शेख यांची भेट घेत ‘फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण देश हिरवा करू’ असे वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण आले आहे.
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्र्यात जाऊन शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सहर शेख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवण्याचा विश्वास व्यक्त केला आणि सहर शेख यांच्या 'मुंब्रा हिरवा करण्याच्या' विधानाला पाठिंबा दिला.
"शिंदे गटाची ठाणे भगवा करण्याची भाषा चालते, तर हिरव्याची का नाही?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी राजकीय हल्ला चढवला. जलील म्हणाले, "सहर शेख यांचं मुंब्रा हिरवा करण्याचं विधान पूर्णपणे योग्य आहे.
येत्या काळात आम्ही महाराष्ट्र हिरवा करू आणि केवळ मुंब्राच नाही तर पूर्ण देश हिरवा करू." या भेटीमुळे मुंबऱ्यातील राजकीय वातावरण तापलं असून, येत्या निवडणुकांमध्ये हिरवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न तीव्र होणार आहे.
