Ravi Rana Vs Sanjay Khodke : दादागिरी Vs धमकी! अमरावतीत रवी राणा आणि संजय खोडके यांच्यात जुंपली

अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा व व राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांच्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा वाद वाढला आहे.
Published by :
Prachi Nate

अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा व व राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांचं कट्टर राजकीय वैर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीत पुन्हा राणा खोडके वाद उफाळला आहे. लोकसभेमध्ये संजय खोडके यांनी महायुतीच्या विरोधात काम केलं. तर विधानसभा निवडनुकसाठी अजित दादांचे मला 50 फोन आले, कि खोडकेला मदत करा. मी जर त्यांच ऐकलं नसतं तर खोडके यांना दहा हजार मतांनी पाडलं असतं त्यामुळे त्यांनी एवढी गूर्मी करू नये दादागिरी करू नये. असा हल्लाबोल रवी राणा यांनी केल.

रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार संजय खोडकेंचा पलटवार केला. रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की ते मला पाडू शकतात. अजित दादांनी एकही फोन रवी राणाला केला नाही, उलट नवनीत राणाच्या प्रचाराला अमरावतीत अजित दादा आले होते तेव्हा रवी राणा यांनी म्हटलं अजित दादाला की, खोडकेला स्टेजवर बोलवा असा दावा संजय खोडके यांनी केला. तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात असा आरोप संजय खोडके यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com