Bhiwandi : भिवंडीत 20 ते 25 आशासेविकांना उष्माघाताचा त्रास, काहींची प्रकृती गंभीर

भिवंडीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोर्चात सहभागी झालेल्या आशासेविकांना उष्माघाताचा त्रास झालेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

भिवंडीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोर्चात सहभागी झालेल्या आशासेविकांना उष्माघाताचा त्रास झालेला आहे. आशा स्वयंसेविका संघाचे शहापूर ते मंत्रालय निघालेल्या मोर्च्यात उष्माघाताने 20 ते 25 आशा स्वयंसेविका चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचे कळाले आहे. पाच ते सहा जणांचे प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. सर्वांना उपचारासाठी भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाहीर वाढीव मानधन व दिवाळी भाऊबीज मिळावा यासाठी मोर्चा निघाला होता. मुंबई नाशिक महामार्गावरील सोनाळे गावच्या हद्दीत उष्माघाताने ही घटना घडली. महिलांना डोळ्यासमोर अंधार येणे ,चक्कर येणे, उलटी येणे, अंग थरथर कापणे अशा प्रकारचे त्रास जाणवत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com