Turkey Earthquake
Turkey EarthquakeTeam Lokshahi

तुर्कीमध्ये पक्षांनी आधीच दिली भूकंपाची कल्पना? भूकंपाआधीचा 'हा' व्हिडिओ प्रचंड होतोय व्हायरल

तुर्कीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे. या भूकंपामुळे पूर्ण देश हादरून गेला आहे. 24 तासांत हा भूकंपाचा तिसरा धक्का त्याठिकाणी बसला आहे.

तुर्की देशात आज भीषण भूकंप झाला आहे. तुर्कीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे. या भूकंपामुळे पूर्ण देश हादरून गेला आहे. 24 तासांत हा भूकंपाचा तिसरा धक्का त्याठिकाणी बसला. संसाराचे संसार उधवस्त झाले आहेत. सोबतच मोठी जीवितहानी झाली आहे. तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे सुमारे 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भूकंपाआधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पक्षी आकाशात घिरट्या घालत विचित्र आवाज काढताना ऐकायला आणि पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसत की, पक्षी घिरट्या घालत विचित्र प्रकारचा आवाज काढताना दिसत आहे. अतिशय भीतीदायक हा आवाज आहे. हा प्रचंड मोठा आणि अतिशय कर्कश आहे. या परिसरातील लोकांनी पक्षांचे हे कधी न पाहिलेलं वागणं आणि हालचाली विचित्र असल्याचे जाणवले आणि काहींनी ही घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित केली. त्यानंतर लगेचच सोमवारी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंप झाला. त्यामुळे या भूकंपाचा आणि त्यांचा संबंध नागरिकांकडून लावला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com