Congress ला दुसरा झटका! आधी हायकोर्टाने याचिका फेटाळली, आता आयकर'ने १७०० कोटींची नोटीस बजावली

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने 1700 कोटी रुपयांची नोटीस बजावल्याने काँग्रेसला झटका काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला सुमारे १७०० कोटी रुपयांची नोटीस जारी केली आहे. याआधी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेसची याचिक फेटाळली होती.

यामुळे आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच सर्वात जुन्या पक्षाची आर्थिक चिंता वाढली आहे. आयकर विभाग 2021-22 ते 2024-25 पर्यंतच्या उत्पन्नाच्या पुनर्मूल्यांकनाची वाट पाहत आहे. याची मुदत रविवार संपणार आहे. काँग्रेसचे वकील विवेक तंखा म्हणाले की, पक्ष कायदेशीर आव्हानाचा पाठपुरावा करेल. त्यांनी आयकर विभागाची ही कारवाई लोकशाहीविरोधी आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com