Shrikant Shinde: श्रीकांत शिंदेंकडून पलावा पुलाची पाहणी

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत आज विकास कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान डोंबिवलीतील पलावा जंक्शन पूल त्याचबरोबर कल्याण नाका परिसरातील पाईपलाईन रोड संबंधित अडचणी अधिकार्‍यांकडून जाणून घेतल्या.
Published by :
Team Lokshahi

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत आज विकास कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान डोंबिवलीतील पलावा जंक्शन पूल त्याचबरोबर कल्याण नाका परिसरातील पाईपलाईन रोड संबंधित अडचणी अधिकार्‍यांकडून जाणून घेतल्या. त्याचबरोबर ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले असून एम एस आर डी सी (MSRDC) आणि एम एम आर डी ए च्(MMRDA) या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ लागली तर संबंधित अधिकाऱ्यांच्या जागेवर चांगले अधिकारी द्या.

चांगले अधिकारी असेल तर कामे ही जलद गतीने होतील अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या त्याचबरोबर कल्याण नाका परिसरात शील रोडची पाहणी करत असताना या मार्गावर सहा लेनचे काम होत असून या मार्गाला लागूनच एलिवेटेड रोड तयार करणार असून कल्याण फाटा ते राजनोली पर्यंत एलिवेटेड रोड साठी 5 हजार कोटीच्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची ही माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com