Sanjay Raut : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे हे स्पष्ट दिसतयं
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीमध्ये वॉर सुरु असल्याचे सांगत गौप्यस्फोट केला. जिथे कौतुक करायचे तिथे आम्ही कौतुक करतो. महायुती सरकार सारखे रडीचा डाव खेळत . आजच्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, "तुम्ही समोर पाहत आहात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कसे युद्ध सुरू आहे हे स्पष्ट दिसत आहे. भ्रष्टाचार संदर्भात अनेक निर्णय होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थांबवले. त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत केले आहे. अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. आधीचे नगरविकास मंत्री किंवा अन्य मंत्र्यानी भ्रष्टाचाराला चालना देणारे निर्णय घेतले होते. त्यांच्या त्या निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले पाहिजे. तुम्ही भ्रष्टाचाराला चालना देणारे आणि खतपाणी घालणारे निर्णय आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने थांबवले आहेत. हे महाराष्ट्राच्या हिताचे होते. म्हणूनच आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही महायुती सरकार सारखं रडीचा डाव खेळत नाही." असे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे.