Jarange Patil: राज्यभर मराठ्यांचा मोर्चा, जरांगे यांचं मराठयांना आवाहन
बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करून कुटुंबीयांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज बीड शहरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे याच भूमिकेत मोर्चा काढला जाणार आहे. याचपार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आपले वक्तव्य मांडले आहे.
यादरम्यान जरांगे पाटील म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीला आपली मुलगी समजा वडिलांसाठी तिची कळकळ समजून घेऊन जिल्ह्या- जिल्ह्यातील मराठ्यांनी मोर्च्याला लागा कोणाची वाट बघू नका... हा येणार आहे, तो येणार आहे, आणि कोण येणार आहे....
जिल्ह्या- जिल्ह्यातील मराठ्यांनी उद्यापासून आपल्या तारखा ठरवा आणि राज्यभर मोर्चे सुरु करा.... प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाल पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यांतील मराठ्यांनी आता उद्यापासून मोर्च्याची तयारी सुरु करा... आज बीड देखील शांततेत मोर्चा काढला जाणार आहे असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.