Palghar Jonty Rhodes Visit : प्रशिक्षण केंद्रावर जॉन्टी रोड्स, तेंडुलकरांच्या फोटोला वाकून नमस्कार

पालघर सारख्या ग्रामीण भागात अद्यावत अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच क्रिकेट पीच उभारल्याने जॉन्टी रोड्स याने इन्स्टिट्यूटचे कौतुक केले.
Published by :
Team Lokshahi

पालघरच्या सफाळे सारख्या ग्रामीण भागात ओमटॅक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट या संस्थेने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात अचानक दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स याने उपस्थिती लावल्याने या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना आनंदाचा धक्का बसला . यावेळी या स्टेडियमच्या आतमध्ये प्रवेश करताना लावण्यात आलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या फोटोच्या पायाला स्पर्श करत जॉन्टी रोड्स याने वाकून नमस्कार केला . तसंच पालघर सारख्या ग्रामीण भागात अद्यावत अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच क्रिकेट पीच उभारल्याने जॉन्टी रोड्स याने इन्स्टिट्यूटचे कौतुक केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com