Kangana Ranaut : मंडीतून कंगना रनौतने सुरु केला प्रचार, मंडीतील भाजप उमेदवार प्रचारात सहभागी

हिमाचल प्रदेशातील मंडीतून कंगना रनौतने प्रचार सुरु केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

हिमाचल प्रदेशातील मंडीतून कंगना रनौतने प्रचार सुरु केला आहे. मंडीतील भाजप उमेदवार प्रचारात सहभागी होणार आहेत. रोड-शो करत लोकांना संबोधित केलं जात आहे. महायुतीकडून कंगना रनौत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

या दरम्यान ती म्हणाली की, मी हिरोईन आहे, की स्टार आहे असे समजू नका. कंगनाला तुमची बहीण, तुमची मुलगी समजा. प्रत्येकजण माझे कुटुंब आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातून तिला भाजपने तिकीट दिल्यानंतर कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com